भरतपूर संस्थान
भरतपूर संस्थान : ब्रिटिशांकित हिंदुस्थानापैकी राजस्थानातील एक संस्थान. क्षेत्रफळ ५,०६३.६८ चौ. किमी. लोकसंख्या सु. ६ लाख (१९४१). वार्षिक उत्तपन्न सु. ३४ लाख. उत्तरेस गुडगाव, पूर्वेस आग्रा-मथुरा हे जिल्हे, दक्षिणेस जयपूर-करौली-धोलपूर व पश्चिमेस अलवर ही संस्थाने यांनी सीमांकित.